नाताळ (Hindi Essay Writing)

Created with Sketch.

नाताळ


ख्रिसमस किवा नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा महत्वपूर्ण सण आहे. ख्रिसमसचा शब्दश: अर्थ आहे क्राइस्ट्स मास अर्थात येशुच्या जन्मा जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो. ख्रिश्नन लोकं या सणाला फार महत्व देतात कारण जीझस ईश्वराचे पुत्र असल्याची त्यांची श्रद्धा आहे. नाताळ हा आनंद व हर्षोल्साचा सणं आहे. या दिवशी गिरिजाघरात प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. शुभ कामना कार्डसची घेवाण देवाण होते. ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करतात. संपूर्ण जगभरातल्या गिरीजाघरां मध्ये येशुची जन्मगाथा झाक्यांच्या रूपात प्रदर्शित केल्या जाते. चोवीस डिसेंबरच्या रात्री पासूनच आरती व पुजा पाठास सुरूवात होते. दूसरया दिवशी सकाळीच जन्म दिनाचा सोहळा असतो. ख्रिश्चन बांधव एक दूसरयांची गळाभेट घेवून शुभेच्छांचे आदान प्रदान करतात. गिरिजाघरात मंगल कामनेचे प्रतिक म्हणून ख्रिसमच-ट्रीची सजावट केली जाते. आज ‍नाताळला धार्मिकते सोबतच सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे. इंग्रजी भाषीक देशामधील लोकं या दिवशी एक विशेष प्रकारची पुडिंग व केक इत्यादी बनवतात. भारताच्या नागरी भागात हा सण पश्चिमी देशां सारखच साजरा करतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना मिठाई व भेट वस्तू देतो. परंतू देशातील आदिवासी आणि खेड्या पाड्‍यांच्या लोकांच खानपान या दिवशी वेगळ असते. तांदुळाच्या रव्या पासून बनविलेली केक व केळी हे यांच्या जेवणाचा एक महत्वपूर्ण भाग असतते. आर्थिकरित्या संपन्न नसणारया घरात हे व्यंजन भेट म्हणून पाठविण्यात येते. दक्षिण भारतात काही भागात पायस वाटण्यात येतो. परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशु‍द्धीचे कारण असते, म्हणून रोमन कॅथोलिक्स संप्रदायाचे लोक एक डिसेंबर पासून पंचवीस डिसेंबरपर्यंत फक्त शाकाहारी भोजनाचे सेवन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This is a free online math calculator together with a variety of other free math calculatorsMaths calculators
+