दिव्यांचा सण दिवाळी (Hindi Essay Writing)

Created with Sketch.

दिव्यांचा सण दिवाळी


 

भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता.असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्वाचे होते कारण श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते, त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधहि केला यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते.दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते कि रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते.त्याबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी “दिपोत्सव” म्हणून ओळखली जाते.या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.पारंपारिक रिती पद्धतीने आणि तज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानल्या जाते. त्यामुळे लोक सोने चांदी खरेदी करतात.दिवाळी साजरी करण्यामागे जरी कोणतेही कारण असो बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. दर वर्षी लोक मिठाiई, कपडे आणि जरुरी वस्तू तसेच आभूषनाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. सामान्य मानुसही यावेळी मनमोकळेपणे खरेदी करतो.दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सन’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्क्रूत् मध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो.भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते.दिवाळीचे पाच दिवसपाच दिवस चालनारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात त्यामध्ये त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात.घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर रांगोळी काढल्या जाते. विविध रंगांनी ती सजवली जाते.दिवाळीच्या पाच दिवसांचे वर्णनधनत्रयोदशीदिवाळीच्या पाच दिवसांनी सरुवात हि धनत्रयोदशी ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो.देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते. बरेचस्या लोकांचे मानणे आहे कि याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.नरकचतुर्दर्शी –हा दिवस छोटी दिवाळी म्हणून जाणला जातो. हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात महिला हातांवर मेहंदी काढतात. दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो. लहान मुलांना उपहार दिले जातात.दिवाली – लक्ष्मीपूजनपाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असे हि म्हणतो. या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते.या देविदेवताना आमंत्रित केले जाते. घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या आणि बाल्कन्या खुले ठेवले जातात.तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते.पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनांच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. गोड पदार्थ खावू घातले जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या दुकांनांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.पाडवा –दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो या दिवशी विवाहित दाम्पत्ती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात.ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल आणि म्हशी व बकरयाणा सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात.भाऊबीज-दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊ-बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांच्या आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करतात.भाऊ बहिणीला छानसे उपहार देवून खुश करतात. व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनाइतकाच पवित्र मानला जातो.हा दिवस भाऊ बहिण सोबत राहून साजरा करतात विवाहित बहिणी माहेरी येतात. भारतात हा दिवस काही राज्यांमध्ये “टीका” या नावाने ओळखला जातो.भारत हा असा देश आहे कि, जेथे विविध जातीधर्माचे समुदाय एकसाथ एका बंधनात राहतात आणि एकमेकाचे सन मोठ्या आनंदात साजरे करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना कमी भेटतात त्यावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याच्या आनंदमयी संधी घेवून येते.लोक एकमेकांना शुभकामना देवून आणि उपहार व दिवाळीचे मिष्ठान्न देवून आपले नाते अधिक बळकट बनवतात.आजच्या काळात सर्व देशवासी पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानाबाबत जागृत आहेत त्यामुळे बरेच परिवार प्रदूषण रहित दिवाळी साजरी करतात. दिवाळीत हानिकारक फटके फोडले जात नाहीत शाळा आणि इतर संस्थांमध्ये तसेच भारत सरकारही नागरिकांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती करतात.चला तर मग आपण हि येणारी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया आणि देशांच्या हितामध्ये आपलेपण योगदान देवूया. हा आपला देश आहे, यास स्वच्छं व सुंदर ठेवणे आपण सर्वाचीच जबाबदारी आहे. देशाला फक्त राष्ट्र न समजता आपले घर समजून त्यास स्वच्छं व सुंदर ठेवले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This is a free online math calculator together with a variety of other free math calculatorsMaths calculators
+